ठाणे पोलिसांचा जलवा जागतिक पातळीवर! बाळू चव्हाण यांची तिहेरी पदकांची कमाई
ठाणे - शहर पोलिस दलातील कर्मचारी बाळू चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. थायलंड येथे आयोजित जागतिक मास्टर्स क्रीडा स्पर्धेत त्यांनी तिहेरी यश संपादन करत ठाणे पोलिस दलाचा मान उंचावला आहे. बाळू चव्हाण यांनी ५ किलोमीटर पायी चाल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर थाळाफेक स्पर्धेत रौप्यपदक आणि भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक मिळवत त्यांनी एकाच स्पर्धेत तीन पदके पटकावण्याची उल्लेखनीय कामगिरी केली.
या शानदार यशामुळे ठाणे शहर पोलिस दलासह संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे शहराचे पोलिस आयुक्त आशुतोष डूमरे यांनी बाळू चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांचा सन्मान केला. तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। बाळू चव्हाण यांच्या या यशामुळे ठाणे शहराचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढला असून, युवकांसाठी ते प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत
रिपोर्टर - साबीर शेख

No Previous Comments found.